नागपूर - पावसाळा सुरू होऊन देखील नागपूर शहरासह जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरात भरपावसाळ्यात पाणी संकट निर्माण झाले आहे. परिणामी शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा निर्णय मनपाने घेतला आहे.
पावसाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या शहरावर पाणीसंकट; दिवसाआड होणार पुरवठा
शहराला पाणी पुरवठा करणारे गोरेवाडा, नवेगाव, खैरी आणि तोतलाडोह धरणांची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी कपात करण्याचा निर्यण माहापालिकेने घेतला आहे. तसेच नागपूरकरांनी पाणी जपून वापरावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
शहरासह जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर पाऊस पडला. मात्र, काही दिवसातच पावसाने दांडी मारली. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे गोरेवाडा, नवेगाव, खैरी आणि तोतलाडोह धरणांची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच नागपूरकरांनी पाणी जपून वापरावे अशा सुचना देण्यात आल्या आहेत. सध्या एका आठवड्यासाठी पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. मात्र, येत्या काळात पावसाची स्थिती जैसे थे राहिल्यास पाणी कपातीमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले.