५० वर्षात पहिल्यांदाच वेणाच्या घशाला कोरड;पाण्याची भीषण स्थिती - venna
१९६८ पासून पहिल्यांदाच पाऊस कमी पडल्याने वेणा जलाशय कोरडा पडला आहे. त्यामुळे गेल्या ५० वर्षातील पहिलीच घटना आहे. त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
५० वर्षात पहिल्यांदाच वेणाच्या घशाला कोरड
नागपूर - दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकरी आणि जनावरांना आधार असलेल्या वेणा डॅम ५० वर्षात पहिल्यांदाच आटला आहे. वेणाच्या घशाला कोरड पडली असून केवळ घोटभरच पाणी शिल्लक आहे. जनावरांना प्यायला पाणी नाही, अशी दुष्काळी स्थितीत आधार असलेला वेणा डॅमदेखील कोरडा पडला आहे.