महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर शहरावर पाणी कपातीचे संकट कायम - तोतलाडोह धरण

मध्यप्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्यामुळे मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात वाहणारी  पेंच नदी कोरडी ठाक पडली आहे. या धरणामुळे नागपूरच्या पेंच प्रकल्पात येणारे पाणी थांबले आहे. पर्यायाने नागपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणात पाणी आले नाही.

नागपूर शहरावर पाणी कपातीचे संकट कायम

By

Published : Aug 23, 2019, 6:39 PM IST

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणात केवळ ९ टक्के इतकाच पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे नागपूर शहराला एक दिवसा आड पाणीपुरवठा केला जाईल असा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा निर्णय ३१ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचादेखील निर्णय घेण्यात आला आहे.

पिंटू झलके,सभापती,पाणी पुरवठा समिती,मनपा

मध्यप्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्यामुळे मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात वाहणारी पेंच नदी कोरडी ठाक पडली आहे. या धरणामुळे नागपूरच्या पेंच प्रकल्पात येणारे पाणी थांबले आहे. पर्यायाने नागपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह धरणात पाणी आले नाही. या वर्षी तोतलाडोह धरण क्षेत्रात पाऊसच झाला नाही. इतिहासात पहिल्यांदाच तोटलडोहमधील पाण्याने तळ गाठला आहे. धरणातील पाण्याचा मृत साठा सुद्धा उचलण्यात आला आहे. त्यामुळे हे धरण कोरडे ठाक पडले आहे. त्यातच अर्धा पावसाळा निघून गेला तरी अजूनही धरण क्षेत्रात पाऊस पडलाच नाही.

गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाला. ज्यामुळे चौराई धरण ९४ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. एरवी ऑगस्ट महिन्यात तोतलाडोह धरणाचा पाणीसाठा हा ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत असतो. मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पात ९४ टक्के जलसाठा झाला आहे. १५ ऑगस्टला पाणीपातळी वाढल्याने या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे तोतलाडोहाच्या जलसाठ्यात थोडी सुधारणा झाली. पण काल पासून पुन्हा चौराई धरणाचे पाणी थांबवण्यात आले आहे. त्यामुळे नागपूरकरांवर पाणी कपातीचे संकट आणखी काही दिवस राहणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा समितीने एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

दरम्यान, कृष्ण जन्माष्टमी निमित्त शनिवारी नागपूर शहरात जागो-जागी दही-हंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या स्पर्धां दरम्यान मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते. हे लक्षात घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे सभापती पिंटू झलके यांनी पाण्याचा अपव्यव टाळण्याचे आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details