नागपूर - शहरात नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आपण आवडीने खात असलेल्या पाणीपुरीचे पाणी चक्क डबक्यातील पाण्याचा वापर करून तयार करण्यात येत असल्याचे समोर आला आहे. शहरातील नंदनवन येथील गुरुदेवनगर चौकातील पाणीपुरीवाला रस्त्यावर जमा झालेल्या डबक्यातील पाण्याचा यासाठी वापर करण्यात येत आहे. या प्रकाराचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - धक्कादायक.. नंदुरबारमध्ये गणेश विसर्जनावेळी एकाच कुटुंबातील सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू
हा पाणीपुरी विक्रेता शहरातील गुरुदेवनगर चौकात पाणीपुरीचा ठेला लावतो. ठेल्याच्या समोरच्या भागातील रस्त्यावरील एका खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असता, या महाशयाने सर्वांची नजर चुकवून ते पाणी एका डब्यात भरले. तसेच याच घाणेरड्या पाण्याने डब्बा भरल्यानंतर तो थेट ते पाणी घेऊन पाणीपुरीच्या गाडीवर पोहोचल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते.