महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nagpur Corporation Ward Formation : नागपूर मनपाची प्रभाग रचना जाहीर; तीन सदस्यांचे 52 प्रभाग

नागपूर महानगरपालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक ( Nagpur Muncipal Corporation Election ) येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेची ( Nagpur Muncipal Corporation Ward Formation ) प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आलेली आहे.

Nagpur
Nagpur

By

Published : Feb 1, 2022, 7:52 PM IST

नागपूर -नागपूर महानगरपालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक ( Nagpur Muncipal Corporation Election ) येत्या काही महिन्यांमध्ये होऊ घातलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेची ( Nagpur Muncipal Corporation Ward Formation ) प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आलेली आहे. ही प्रारूप प्रभाग रचना कशी असेल, याकडे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले होते. आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकून 52 प्रभागात प्रत्येकी 3 नगरसेवक सदस्य असणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

हरकती-सूचना देण्याचे आवाहन -

नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करताना एकूण 156 सदस्यांकरिता 52 प्रभागाचे प्रारुप नकाशेदेखील जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, असे मानण्यात येते आहे. प्रभाग रचनेवर नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान सिव्हिल लाईनयेथील नागपूर महानगर पालिकेतील मनपा निवडणूक कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर हरकती आणि सूचनांवर सुनावणी केली जाणार आहे.

हेही वाचा -Anil Parab Resort : अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडण्याचे केंद्र सरकारचे आदेश - किरीट सोचा

ABOUT THE AUTHOR

...view details