महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक : नागपुरात मोहन भागवतांसह आशिष देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क - nagpur assembly election

नागपुरात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १२ जागांवर प्रमुख उमेदवारांसह एकूण 143 उमेदवार रिंगणात आहेत.

विधानसभा निवडणूक

By

Published : Oct 21, 2019, 7:35 AM IST

Updated : Oct 21, 2019, 11:24 AM IST

नागपूर -विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान घेण्यात येत आहे. त्यासाठी नागपुरात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाची सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १२ जागांवर प्रमुख उमेदवारांसह एकूण 143 उमेदवार रिंगणात आहेत.

LIVE UPDATE -

  • 10.17- आशिष देशमुखांनी बजावल सहकुटुंब मतदानाचा हक्क
    आमचा विजय सुनिश्चित आहे येत्या २४ तारखेला इतिहास रचला जाईल. देवेंद्र फडणवीस यांचा पराभव होईल आणि गुलाल काँग्रेस उधळले आणि हा परवर्तन निश्चित आहे, असे मत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणारे काँगेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले.
    आशिष देशमुखांनी बजावल सहकुटुंब मतदानाचा हक्क
  • 10.15 - विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नव मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. जो उमेदवार सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करेल त्या उमेदवाराची निवड करणार असल्याचे मत नव मतदारांनी व्यक्त केले.
    नव मतदारांशी संवाद साधला ईटीव्ही भारतचे प्रतनिधी धनंजय टिपले यांनी
  • 10.05 AM - तामिळनाडू राज्याचे राज्यपाल बनवारिलाल यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी नागपूरसह राज्यातील जनतेने 100 टक्के मतदान करून राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
    तमिळनाडूचे राज्यपाल बनवारिलाल पूरोहित यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • 7.09 AM - सरसंघचालक मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क
    मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क
  • 7.00 AM - नागपुरातील १२ मतदारसंघात मतदानाला सुरुवात
    नागपुरात मतदानाला सुरुवात

किती मतदार बजावणार हक्क? -
जिल्ह्यातील 41 लाख मतदार आपल्या लोकप्रतिनिधींची निवड करणार आहेl. यामध्ये 21 लाख पुरुष, तर 20 लाख महिला मतदारांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत नवीन म्हणजेच पहिल्यांदा निवडणुकीचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची भूमिका सुद्धा महत्वाची राहणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्य प्रशासनाकडून मोठे प्रयत्न करण्यात आले आहेत. नागपूर शहरातील 6 आणि जिल्ह्यातील 6 अशा एकूण 12 जागेसाठी 143 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

Last Updated : Oct 21, 2019, 11:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details