महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर पदवीधर निवडणूक मतमोजणी; पहिला कल दुपार नंतरच - नागपूर पदवीधर निवडणूक निकाल न्यूज

राज्यात १ डिसेंबरला शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. आज त्याची मतमोजणी होत आहे. नागपूरमध्येही सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली.

vote counting
मत मोजणी

By

Published : Dec 3, 2020, 12:13 PM IST

नागपूर - पदवीधर निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निकालासाठी शुक्रवार उजाडण्याची शक्यता आहे. पहिला कल येण्यासाठी देखील दुपारचे तीन वाजणार असे बोलले जात आहे. सुरुवातीला सर्व मत पत्रिकांना एकत्र करून त्याचे २५ प्रमाणे गठ्ठे तयार केले जात आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

विभागीय क्रीडा संकुलात मतमोजणीला सुरुवात

सर्व अधिकारी केंद्रांवर उपस्थित -

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात झाली. निवडणूक निरीक्षक एस. वी. आर. श्रीनिवास, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्यासह विभागातील सहा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व मतमोजणीशी संबंधित विविध अधिकारी केंद्रावर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे होत आहेत.

२८ टेबलवर मतमोजणी -

पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात एकूण 1 लाख 32 हजार 923 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 64. 38 आहे. चार कक्षांतील 28 टेबलवर मतमोजणी होत आहे. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येत आहेत. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे, अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर मोजणीसाठी दिली जाणार आहेत. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल. एकूण वैध मतांप्रमाणे ठरवण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्यास आवश्यकतेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या अशा पसंतीची मते मोजण्यात येतील, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details