नागपूर Gajanan Maharaj Granth Parayan Sohala: खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत आज नागपूरच्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षक महाविद्यालयाच्या पटांगणात गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण (Gajanan Vijay Granth Parayan Sohala) करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णूल मनोहर यांनी एकाचं वेळी तीन हजार किलो खिचडीचा महाप्रसाद तयार केला. सुमारे ४५ हजार गजानन महाराज भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
तीन हजार किलोची केली खिचडी तयार : ‘अन्न हे पुर्णब्रम्ह’ असे गजानन महाराज नेहमी म्हणायचे. त्यांच्या पोथीमध्ये खिचडीचा उल्लेख आढळतो. सध्या नागपूरात खासदार संस्कृतीक महोत्सवाचे आयोजन सुरू आहे. त्यात गजानन महाराजांचे पारायण करण्यात आले. यावेळी भक्तांसाठी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी एका भल्या मोठ्या कढईत तीन हजार किलोची खिचडी तयार केलीय. त्यात, तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, कोबी, कांदे, गाजर, शेंगदाणे, कोथिंबिर, तेल, तूप, मीठ, हळद, मिरची, गरम मसाला, दही, साखर, पाणी या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. तीन हजार किलोची खिचडी तयार करण्यासाठी १० फूट व्यासाची, ५ फूट ऊचीची कढई वापरली आहे.
विश्वविक्रमी विष्णू: शेफ विष्णू मनोहर यांनी याआधी अनेक रेकॉर्ड केले आहेत.गणेशोत्सवात विष्णू मनोहर यांनी नागपुरातच अडीच हजार किलो सादळलेले डाळीचा प्रसाद केला होता. ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असा "सर्वात लांब पराठा' तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तीन तासात ७ हजार किलोची महा मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी २० डिसेंबर २०१८ रोजी भारतात ३२०० किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करून 'वर्ल्ड रेकॉर्ड' केला आहे. त्यांनी ३००० किलो खिचडी तयार करीत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. नंतर ५००० किलो खिचडी शिजवून त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे.