नागपूर- विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज नागपूर दौऱ्यावर आले आहेत. नड्डा यांच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळ ते दीक्षाभुमी बाईक रॅली काढण्यात आली होती. मात्र, या बाईक रॅलीमध्ये कार्यकर्ते वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसत आहेत. यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याच शहरात वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्र्यांच्या जिल्ह्यात बाईक रॅलीतून वाहतूक नियमांची पायमल्ली - J. P. Nadda BJP President
भाजप कार्यध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नागपूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासमोर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीत वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे पहायला मिळाले.
जे पी नड्डा यांच्या नागपूर दौऱ्यानिमीत्त बाईक रॅली
बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या काही कार्यकर्त्यांनी हेल्मेट न घालताच बाईक चालवली आहे. नियम हे फक्त सामान्य माणसांसाठीच असतात काय, असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. सत्तेत असलेल्या पक्ष्यांच्या कार्यकर्त्यांवर वाहतूक विभाग कारवाई करते काय हे बघणे महत्वाचे आहे.
Last Updated : Sep 18, 2019, 3:59 PM IST