नागपूर -मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात वाघाची दहशत निर्माण झाल्याने ग्रामस्थ प्रचंड दहशतीखाली आहेत. वन विभागाने शोध मोहीम राबवली पण अद्याप वाघाचा ठावठिकाणा लागलेला नाही.
मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात वाघाची दहशत - C.M adopted Fatari village
मुख्यमंत्र्यानी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातील ग्रामस्थ वाघाच्या दहशतीखाली आहेत. याठिकाणी वन विभागाचे पथक शोध मोहीम राबवत आहे.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर मार्गावर फेटरी, येरला, खड्गाव, आलेसुर, सावली भागातील जंगलात मागील काही दिवसांपासून वाघ आल्याची चर्चा आहे. त्याने दोन जनावरांची शिकार केल्याची सुद्धा चर्चा आहे. ग्रामस्थांनी वन विभागाला याची माहिती दिल्या नंतर वन विभागाचे पथक त्या ठिकाणी शोध मोहीम सुद्धा राबवत आहे. मागच्या आठवड्यात काही भागात वाघाच्या पावलांचे ठसे आठळून आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भागात वाघाचा वावर असावा अशी शंका नागरिकांमध्ये आहे. त्या ठिकाणी वाघामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाचा चमू या ठिकाणी शोध मोहीम राबवत असला तरी अजून त्यांना वाघ शोधण्यात यश आलेले नाही.