महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खातेवाटपानंतर विजय वडेट्टीवार नाराज?; दोन्ही दिवशी नागपूर दौरा रद्द - नागपूर बातमी

खातेवाटपाची यादी जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. विधानसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्त्वात विदर्भात काँग्रेसला १६ जागा मिळाल्या. मात्र, खाते वाटपामध्ये मोठे मंत्रिपद वडेट्टीवरांच्या वाट्याला आलेले नाही.

vijay-wadettiwar-nagpur-tour-canceled
vijay-wadettiwar-nagpur-tour-canceled

By

Published : Jan 6, 2020, 1:11 PM IST

नागपूर- खातेवाटपावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी चेहरा असलेले विजय वडेट्टीवार हे सध्या नाराज असल्याचे चित्र आहे. त्यांना मिळालेल्या खात्यांवर ते समाधानी नसल्याची माहिती पुढे येत आहे. मुंबईवरून नागपूरला येण्यासाठी वडेट्टीवारांचा दोन वेळा दौरा आयोजित करण्यात आला. मात्र, दोन्ही वेळेस हा दौरा रद्द करण्यात आला.

हेही वाचा-'बँक शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर सरकार गंभीर निर्णय घेईल'

खातेवाटपाची यादी जाहीर झाल्यानंतर वडेट्टीवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. विधानसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्त्वात विदर्भात काँग्रेसला १६ जागा मिळाल्या. मात्र, खाते वाटपमध्ये मोठे मंत्रिपद वडेट्टीवरांच्या वाटेला आलेला नाही. वडेट्टीवारांकडे ओबीसी, खार जमिन विकास, भूकंप पुनर्वसन, विमुक्त जाती खात्याची जबाबदारी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details