नागपूर Vijay Wadettiwar : कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर न्यायालयाने अत्यंत गंभीर स्वरुपाचे निरीक्षण नोंदवले आहे. खरं तर या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळातून मुश्रीफांची (Vijay Wadettiwar On Hasan Mushrif) तत्काळ हकालपट्टी करावी, त्यांना मंत्री म्हणून पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरला नाही, असं राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटंल आहे. ते आज नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते.
पुढच्या १० ते १२ दिवसांमध्ये मंत्रिमंडळातील नऊ भ्रष्टाचारी मंत्र्यांना काढावेच लागेल. तो दिवस दूर नाही. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, तरीही त्यांना शुद्ध करून गोमूत्र शिंपडून व वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करून घेण्याचा प्रयत्न झाला.पण 'दाग जिद्दी है' अशी परिस्थिती या मंत्र्यांची झालेली आहे. या नऊ मंत्राची नावे तुम्ही विचारला तर मी आत्ता सांगू शकत नाही. मंत्रिमंडळाच्या फेर बदलानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात नसतील. मी हे खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. - विजय वडेट्टीवार,विरोधीपक्ष नेते
मंत्र्यांवर गंभीर आरोप : राज्य मंत्रिमंडळ हे (State Cabinet) नव्याने झालेल्या तीन जणांच्या घोटाळ्याने बटबटलेले आहे. पूर्णतः घोटाळेबाज मंत्रिमंडळ आहे. लुटमार करणारे आहे. शब्दही अपुरे पडतील अशा प्रकारचे गंभीर आरोप या सर्वांवर आहेत. येणाऱ्या पंधरा दिवसांच्या आत यांना काढावेच लागेल. नाहीतर यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आम्ही जनते समोर मांडल्या शिवाय राहणार नाही. कारण या सर्वावर आम्ही आरोप लावलेले नाहीत. तर या सर्व मंत्र्यांवर भारतीय जनता पक्षानेच आरोप लावलेले आहेत. त्यांच्याचं नेत्यांनी तक्रारी केल्या आहेत, त्या तक्रारीनंतरच यांच्यावर गुन्हे दाखल झालेत किंवा इडीनं नोटीस बजावली आहे.