नागपूर - मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नसल्याची टीका शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. झिरो बजेट शेती कशी करायची हेदेखील सरकारने सांगावे, असा टोला त्यांनी लावला आहे.
UNION BUDGET 2019: मोदी सरकारने शेतकऱ्यांची उपेक्षा केली - विजय जावंधिया - farming in india
कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्री कोणत्या योजना आणि घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र, कृषी क्षेत्राला निर्मला सीतारामन यांनी उपेक्षित ठेवल्याचा आरोप विजय जावंधिया यांनी केला आहे.
या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्राला विशेष अपेक्षा होती. कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्री कोणत्या योजना आणि घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र, कृषी क्षेत्राला निर्मला सीतारामन यांनी उपेक्षित ठेवल्याचा आरोप विजय जावंधिया यांनी केला आहे. आजचे बजेट विरोधी पक्षाला राजकीय उत्तर देण्यासाठी तयार केले असल्याने यातून शेतकऱ्यांची घोर निराशा झाल्याचे देखील ते म्हणाले. या सर्व मुद्यांवर आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांचे मत जाणून घेतले.