महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर - Graduate Constituency Election

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ ( Vidhan Parishad Teacher Constituency ), पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा ( Graduate Constituency election ) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ( Legislative Council of Maharashtra ) 5 जागांपैकी 2 जागा या विदर्भातील आहेत. नागपूर शिक्षक मतदारसंघ ( Nagpur Teachers Constituency ), अमरावती पदवीधर मतदार संघाचा ( Amravati Graduate Constituency ) यात समावेश आहे.

Vidhan Parishad Teacher Constituency
Vidhan Parishad Teacher Constituency

By

Published : Dec 29, 2022, 7:01 PM IST

नागपूर - महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर ( Graduate Constituency election ) , शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा ( Vidhan Parishad Teacher Constituency ) कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात राज्यातील 2 पदवीधर, 3 शिक्षक मतदार संघाचा समावेश ( Legislative Council of Maharashtra ) आहे. नाशिक, अमरावती हे पदवीधर तर नागपूर, कोंकण, औरंगाबाद या शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे.

30 जानेवारीला मतदान -या निवडणुकीची अधिसूचना 5 जानेवारीला जारी होणार आहे. 12 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. 16 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार, तर 30 जानेवारीला मतदान होणार आहे. 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार रणजित पाटील यांची उमेदवारी या आधीच भाजपने जाहीर केली आहे. तर नागपूर शिक्षक मतदार संघासाठी अनेक इच्छुक उमेदवार असतानाही सलग तिसऱ्यांदा विद्यमान आमदार नागो गाणार यांची उमेदवारी भाजप तर्फे निश्चित मानली जात आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपमध्ये टक्कर -काँग्रेसचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्नेही युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार होते. त्यांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळं काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या मतदारसंघात देखील निवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीनं दोन वर्षांपूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यामुळं शिक्षक मतदारसंघात देखील विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर, अमरावती पदवीधरमध्ये भाजपनं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच रणजीत पाटीलला उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळं भाजपसाठी देखील या मतदारसंघातील विजय महत्त्वाचा असेल.

होणार चुरशीची लढत -नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे रणजीत पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील, नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. आता या मतदारसंघात कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details