नागपूर- शहरातील दिघोरी पुलाजवळ काल एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या गोळीबारीचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. यामध्ये हल्लेखोरांनी इम्रान सिद्दिकी नावाच्या युवकावर कशा प्रकारे गोळीबार केला ते स्पष्ट दिसून येत आहे.
इम्रान सिद्दिकीवर गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल, दोन आरोपी ताब्यात - nagpur
पांढऱ्या रंगाच्या मोपेडवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी तोंडाला कापड बांधून इम्रानवर गोळीबार केला होता. या घटनेत इम्रान गंभीर जखमी झाला आहे. गोळीबाराच्या आवाजाने घटनास्थळावरील लोकांची पळापळ झाल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
पांढऱ्या रंगाच्या मोपेडवर आलेल्या तीन हल्लेखोरांनी तोंडाला कापड बांधून इम्रानवर गोळीबार केला होता. या घटनेत इम्रान गंभीर जखमी झाला आहे. गोळीबाराच्या आवाजाने घटनास्थळावरील लोकांची पळापळ झाल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दोन आरोपींना पकडण्यात यश आले असून त्यांच्या जवळून एक देशी कट्टा जप्त केला आहे. घटनेत इम्रानला दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून पोलिसांनी घटनास्थळावरून बुलेटचे शेल जप्त केले आहे. प्राथमिक दृष्ट्या ही घटना जुन्या वैमानस्यातून घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हेही वाचा-अकोल्यात अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात गुन्हे शाखेला यश