नागपूर - 'विदर्भ राज्य आंदोलन समिती' तर्फे संपूर्ण विदर्भात वेगळ्या विदर्भाकरिता आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानक परिसरामध्ये काहींनी चक्काजाम आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वीज बिलात सातत्याने होणारी वाढ व लावलेला अधीभार यामुळे सरकार जनतेची लूट करत असल्याचे आंदोलकांनी यावेळी म्हटले आहे.
विदर्भाने वीज प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण का सहन करावे? विदर्भवादी आंदोलकांचा चक्काजाम हेही वाचा - अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'मराठी भाषा सक्ती' विधेयक; सत्ताधारी-विरोधकांचे होणार एकमत
आंदोलक व विदर्भवादी नेते राम नेवेल म्हणाले, "सर्वाधिक औष्णिक वीज प्रकल्प हे विदर्भात आहेत जमीन आणि पाणी विदर्भातील वापरली जाते तसेच वीज निर्मितीमुळे होणारे प्रदूषण विदर्भाने का सहन करायचे. तरी देखील विदर्भातील जनतेला अधिक वीज बिल द्यावे लागत आहे. विदर्भ वेगळा झाला तर कमी किमतीत वीज मिळेल." अशी आशा त्यांनी व्यक्त केला. तसेच शेती पंपाचे वीज बिल माफ करा, भारनियमन संपवा, अश्या मागण्या विदर्भवादी नेत्यांनी केल्या आहेत. आंदोलन दरम्यान आंदोलकांनी चक्का जाम केल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा चौथ्यांदा दिलासा, 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश