नागपूर- भाजप शिवसेनेची महायुती तुटल्याचा सर्वाधिक आनंद विदर्भावाद्यांना झाला आहे. वेगळा विदर्भ होण्याच्या मार्गात सर्वात मोठी अडचण ही शिवसेना असल्याने महायुतीतून शिवसेना बाहेर पडल्याने विदर्भाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे विदर्भवाद्यांनी सांगितले आहे.
शिवसेना महायुतीतून बाहेर पडल्याने वेगळ्या विदर्भाचा मार्ग मोकळा; विदर्भवाद्यांना विश्वास - वेगळा विदर्भ
भाजप शिवसेनेची महायुती तुटल्याचा सर्वाधिक आनंद विदर्भावाद्यांना झाला आहे. वेगळा विदर्भ होण्याच्या मार्गात सर्वात मोठी अडचण ही शिवसेना असल्याने महायुतीतून शिवसेना बाहेर पडल्याने विदर्भाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे विदर्भवाद्यांनी सांगितले आहे.
2014 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपने आपल्या घोषणा पत्रात वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. त्यानंतर राज्याच्या सत्तेत माहायुतीचे सरकार आल्यानंतरसुद्धा भाजपने वेगळ्या विदर्भाचे अश्वासान पूर्ण केले नाही. सत्तेत शिवसेना भागीदार असल्यानेच वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनाची पूर्तता होऊ शकली नाही, अशी भूमिका भाजपचे नेते ऑफ द कॅमरा घेतात.
आता महायुतीचे दोन तुकडे झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन पूर्ण करण्याची हीच ती वेळ असल्याचे विदर्भावाद्यांना वाटू लागले आहेत. त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी विदर्भवादी नेते राम नवले यांनी केली आहे.