नागपूर- सलग चार दिवस नागपूरसह विदर्भात सूर्याने आग ओकल्यानंतर आता वातावरणात अचानक बदल झाला आहे. विदर्भातील काही भागात तुरळक पावसाचे आगमन झाल्यानंतर तापमान काहीशी घट झाली आहे तर ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक ( Regional Meteorological Department ) एम एल साहू यांनी दिली.
Vidarbha Temperature Drop : वाऱ्यांची दिशा बदलताच विदर्भाच्या तापमानात घट - वाऱ्यांची दिशा
सलग चार दिवस नागपूरसह विदर्भात सूर्याने आग ओकल्यानंतर आता वातावरणात अचानक बदल झाला आहे. विदर्भातील काही भागात तुरळक पावसाचे आगमन झाल्यानंतर तापमान काहीशी घट झाली आहे तर ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक ( Regional Meteorological Department ) एम एल साहू यांनी दिली
राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे तापमानात घट झाली आहे. गेल्या आठवड्यात विदर्भात उष्णतेची लाट येणार, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार अनेक जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. मात्र, काही भागात तुरळक पावसाचे आगमन झाल्याने तापमानात घट झाली आहे. त्यामुळे अति उष्णतेचा इशारा मागे घेण्यात आला आहे. बंगालच्या खाडीकडून येणाऱ्या थंड हवेमुळे दमटपणा वाढला आहे. त्यामुळेच विदर्भाच्या आकाशात ढग दाटले आहेत. येणारे पुढील पाच दिवसांपर्यंत तापमान सामान्य राहील, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही वाचा -Good news for NCC students : एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; पोलीस भरतीत मिळणार अधिक गुण