नागपूर- वेगळा विदर्भासह अन्य मागण्यांसाठी विदर्भ राज्य समितीच्या वतीने बससमोर जाऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. गणेशपेठ बसस्थानकासमोर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला आंदोलकांनी रस्त्यावर झोपून आंदोलन केल्याने त्यांना ताब्यात घेताना पोलिसांची भंबेरी उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वेगळा विदर्भ, कोरोना काळातील वीज बिल माफी, पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्यावी यासह अन्य आंदोलन करण्यात आले. ऑगस्ट क्रांती दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत वेगवेगवेगळे आंदोलन केले होते. याच आंदोलनाचा दुसरा टप्पा आजपासून रस्ता रोको, जेलभरो आंदोलन सुरू करण्यात आला. यामध्ये विदर्भावाद्यांनी गणेशपेठ परिसरात एकत्र येत हातात फलक घेऊन सरकार विरोधात घोषणा दिल्या. यानंतर बसस्थानकाकडे जात बस अडवत आंदोलन सुरू केले. यावेळी काहींनी बसवर चढून तर काहींनी बससमोर बसून आंदोलन केले. गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
महिला आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिसांची दमछाक
यावेळी काही महिला पदाधिकारी दटून राहिल्याने त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी महिला पोलीस त्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात पोलिसांची दमछाक झाली. काही करता महिला आंदोलक जागा सोडत नव्हत्या प्रतिकार करत त्यानी आंदोलन सुरुच ठेवले. यावेळी काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी अखेर उचलून घेत त्यांना पोलीस वाहनात बसवले आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
नेत्यांनी गावबंदीचा इशारा