महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या घरावर मोर्चा

वीज प्रकल्प हे विदर्भात आहे. जमीन आणि पाणी विदर्भातील वापरली जाते. तसेच वीज निर्मितीसाठी प्रदूषण देखील इथेच होते आणि विदर्भातील जनतेलाच अधिकच वीज बिल द्यावे लागत आहे. त्यामुळे विजेचे दर निम्मे झाले पाहिजे, शेती पंपाचे वीज बिल माफ करा, भारनियमन संपवा आणि एसएनडीएल वीज कंपनी बरखास्त करा, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मोर्चा

By

Published : Aug 10, 2019, 3:46 PM IST

नागपूर- वीज बिलात सातत्याने होणारी वाढ, वीज बिलावर लावलेली प्रचंड भार आणि अधिभारामुळे विदर्भातील जनतेची लूट शासन करत आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता.

नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फ़ ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या घरावर मोर्चा

औष्णिक वीज प्रकल्प हे विदर्भात आहे. जमीन आणि पाणी विदर्भातील वापरली जाते. तसेच वीज निर्मितीसाठी प्रदूषण देखील इथेच होते आणि विदर्भातील जनतेलाच अधिकच वीज बिल द्यावे लागत आहे. त्यामुळे विजेचे दर निम्मे झाले पाहिजे, शेती पंपाचे वीज बिल माफ करा, भारनियमन संपवा आणि एसएनडीएल वीज कंपनी बरखास्त करा, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मार्च महिन्यात वीज बिल संदर्भात ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यांनी विदर्भ आंदोलन समितीच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यासाठी पुढील दोन महिन्याचा वेळ मागितला होता.

त्यामुळे ३ जूनपर्यंत समितीने आंदोलन पुढे ढकलले होते. कालावधी संपून ऑगस्ट महिना सुरू आहे, तरीही त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने ऊर्जा मंत्र्यांचे निवासस्थानच घेरले आणि आंदोलन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details