नागपूर -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कारकीर्दीतील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या बजेटकडे देशातील उद्योजकांसह विदर्भातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले होते. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि उद्योगधंद्याना चालना मिळावी, याकरता अर्थमंत्री कोणत्या घोषणा करतात हे बघण्यासाठी नागपूरच्या उद्योग भवनातील 'विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन'च्या कार्यालयात सर्व उद्योजक एकत्र आले होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी रिटर्न भरण्याची पद्धत आणखी सोपी करणार असल्याचे म्हटले आहे. जीएसटीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा झाला असल्याचे सांगताना त्यांनी देशातील उद्योगधंद्यांना चालना मिळावी याकरता प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. सन २०१४ ते १९ या काळात देशात एफडीआय वाढला असून हा आकडा २८४ बिलियन डॉलरपर्यंत पोहचलेला आहे. त्यामुळे देशावरील कर्ज कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.