नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे ( separate Vidarbha demand ) अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. याकडे राज्यकर्ते फार गंभीरपणे बघत नसल्यामुळे विदर्भवाद्यांनी ( Vidarbha activists ) लक्ष वेधण्यासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. विदर्भवाद्यांची नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाकरिता आर-पारची लढाई सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी विदर्भातील दहा खासदारांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे राजीनामा मागितले जाणार असल्याचा प्रमुख निर्णय घेण्यात आला आहे.
Separate Vidarbha demand : वेगळ्या विदर्भासाठी खासदारांच्या कार्यालयात जाऊन विदर्भवादी मागणार राजीनामा - Separate Vidarbha demand
वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे ( separate Vidarbha demand ) अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. याकडे राज्यकर्ते फार गंभीरपणे बघत नसल्यामुळे विदर्भवाद्यांनी ( Vidarbha activists ) लक्ष वेधण्यासाठी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. विदर्भवाद्यांची नुकतीच एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाकरिता आर-पारची लढाई सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी विदर्भातील दहा खासदारांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे राजीनामा मागितले जाणार असल्याचा प्रमुख निर्णय घेण्यात आला आहे.
भाजपाने दिले होते वचन - भारतीय जनता पक्षाने २०१४ साली सत्तेत आल्यास विदर्भ राज्याच्या निर्मितीचे जाहीर अभिवचन दिले होते. मात्र, त्यानंतर हा विषय राजकीय सोयींसाठी मागे टाकण्यात आला. त्यामुळे खासदार म्हणून खुर्चीत राहण्याचा अधिकार गमावल्यामुळे ११ रोजी त्यांच्या कार्यालयात जाऊन जाहीरपणे राजीनामा मागणार असल्याचे विदर्भावाद्यांनी स्पष्ट केले आहे.
वेगळ्या विदर्भाबद्दल तुमची भूमिका स्पष्ठ करा - निवडणूका आल्या की सर्वच राजकीय पक्षांना वेगळ्या विदर्भाची आठवण आवर्जून होते. त्यामुळे विदर्भवादी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या १० खासदारांनी विदर्भ राज्य निर्मितीबाबत त्यांची व त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे? हे जाहीरपणे स्पष्ट करण्यासाठी भाग पाडणार असल्याचे विदर्भवाद्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.