नागपूरVHP To Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल (बुधवारी) प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद आज राज्यात उमटू लागले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत मूर्खातापूर्ण आहे. (Vishwa Hindu Parishad) यापेक्षा जास्त मूर्खातापूर्ण दुसरं व्यक्तव्य होऊ शकत नाही. पूर्ण देशात राममय वातावरण झालं आहे. ते जाणीवपूर्वक रामाचा अपमान करीत आहेत. समाज त्यांना कधीही माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय महामंत्री गोविंद शेंडे यांनी दिलीय. ते नागपुरात बोलत होते. (Govind Shende)
आमची लीगल चर्चा सुरू :हिंदूंच्या श्रद्धेवर आघात केल्यास समाज कधीही माफ करणार नाही. आमची लीगल चर्चा सुरू आहे. ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करू. त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा देखील गोविंद शेंडे यांनी दिला.
डिवचण्यासाठी केलेलं वक्तव्य :आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाणूनबुजून हे वादग्रस्त वक्तव्य केलं. देशात राममय वातावरणाची निर्मिती होत असताना समाजा-समाजात तेढ, अराजकता, अस्वास्थ्यता तयार करण्याचं काम त्यांनी केलं आहे. वनवासात रामाने कंद, मूळं खाऊन जीवन निर्वाह केला आहे. संन्यासी ऋषी महात्मा मांसाहारी नव्हते. हे तर डिवचणारं वक्तव्य असल्याचं विहिंपचे क्षेत्रीय महामंत्री गोविंद शेंडे यांनी स्पष्ट केलं आहे.