नागपूर -शहरातील एकही खासगी किंवा शासकीय रुग्णालयात बेडसुद्धा उपलब्ध नाही. रुग्णांची या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फरफट होत असताना गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन बेडदेखील मिळत नसल्याच्या तक्रारी सत्तात्याने पुढे येत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीएसआर फंडातून विशाखापट्टणमच्या 'एमटीझेड'द्वारे निर्मित व्हेंटिलेटर मशिन्स नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली आहे. अत्यल्प दरात हे व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत. या मशीनचे प्रात्यक्षिक नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
नागपूरकरांना 'सीएसआर' फंडातून व्हेंटिलेटर होणार उपलब्ध हेही वाचा -मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन मानले पंतप्रधानांचे आभार, हाफकिनला मिळाली लस निर्मितीची परवानगी
आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी सामूहिक प्रयत्न
करोनाचे संकट किती दिवस चालणार हे सांगता येणार नाही. त्यामुळे आपली आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या व्हेंटिलेटरचा अभाव बघता विशाखापट्टणम येथून एक हजार व्हेंटिलेटर मागविण्यात येणार आहेत. शिवाय ऑक्सिजनचा पुरवठा सुद्धा तेथूनच होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. विशाखापट्टणम येथून मागवण्यात येणाऱ्या व्हेंटिलेटरचे प्रात्यक्षिक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरातील निवासस्थानी करण्यात आले,यावेळी नितीन गडकरी यांच्या सोबत नागपूरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी या व्हेंटिलेटरची पाहणी केली आहे. हे मशीन केवळ दोन लाख रुपयात उपलब्ध होणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती भीषण
नागपूरात कोरोनाची परिस्थिती अतिशय भीषण आहे. अशा परिस्थितीत भविष्यातील अवाहनांसाठी आपल्याला तयार व्हावेच लागेल, असे नितीन गडकरी म्हणाले. रुग्णामच्या शरीरात शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत आपल्याला प्रयत्न करावेच लागतील. या कठीण परिस्थितीमध्ये लोकांची सेवा आपल्याला कशी करता येईल याचा विचार करायला हवा, असेही गडकरी म्हणाले.
हेही वाचा -राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार, म्हणाले- एकत्रित संकटावर मात करता येईल