नागपूर - आज वटपौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे. शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे वटसावित्री पूजेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यासाठी अजनी येथील वनात झाड कापण्याची नोटीस चिटकवलेल्या वट वृक्षाची महिलांनी पूजा करून झाडे कापण्याच्या शासन निर्णयाचा निषेध केला.
वटपौर्णिमेचा व्रत सगळीकडे उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या व्रता दरम्यान पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. एकीकडे वडाच्या झाडाची हिंदू रितीनुसार पूजा करताना झाडांचे संवर्धन व संरक्षण देखील तेवढेच महत्वाचे आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे आज अजनी मधील वडाच्या झाडाची पूजा करण्यात आली.