महाराष्ट्र

maharashtra

Hanuman Jayanti : हनुमान जयंतीनिमित्त तेलखेडी हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन, मंदिराला 300 वर्षांचा इतिहास

By

Published : Apr 5, 2023, 10:37 PM IST

Updated : May 8, 2023, 1:28 PM IST

तेलनखेडी हनुमान मंदिर हे नागपूर किव्हा विदर्भातीलचं नाही तर मध्यभारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. भोसले कालीन हे मंदिर असून सुमारे 300 वर्षांपेक्षा अधिकचा प्रगल्भ इतिहास या ऐतिहासिक मंदिराला लाभला आहे. भक्तांच्या हाकेला कायम साथ देणारे बजरंगबली म्हणून देखील तेलनखेडीचं हे मंदिर भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे.

Hanuman Jayant
Hanuman Jayant

नागपूर :तेलनखेडीचे हे मंदिर संकटमोचन हनुमान मंदिर म्हणूनही ओळखले जाते. एका छोट्या टेकडीवर हनुमान मंदिराची स्थापना केली असून हनुमानाची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. जवळपास दोन वर्षांनंतर हनुमान जयंती साजरी करता येणार असल्याने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जंगलात हनुमानाचे प्रकटन : भक्तांचे नवस करणारे तेलनखेडी हनुमान मंदिर, फुटाळा तलाव आणि सेमिनार टेकडीच्या मध्यभागी एका छोट्या टेकडीवर वसलेले आहे. हनुमानाची मूर्ती स्वयंनिर्मित असल्याने ती केव्हा प्रगट झाली याची नेमकी माहिती कोणाला नाही, परंतु जुन्या जाणकारांच्या मते हे मंदिर भोसले राजवटीचे आहे. सुमारे 300 वर्षे घनदाट जंगलात हनुमानाची प्रतिमा प्रकट झाल्याची आख्यायिका आहे.

नवस करणारी मंदिरे : नंतर जंगलात तपश्चर्या करणाऱ्या ऋषींनी तेलनखेडी टेकडीवर हनुमानाची मूर्ती स्थापित केली. तेव्हापासून मंदिराचे नाव तेलनखेडी हनुमान मंदिर असे ठेवण्यात आल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले. गंगागिरी महाराजांनी मंदिर बांधले. त्यानंतर महेशगिरी महाराजांनी मंदिराचा विकास केला. चमत्कारिक, नवसाला तेलनखेडी हनुमान मंदिर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. याची प्राचिती वेळोवेळी अनेकांना आली असल्याचे मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितले आहे.

इतिहासाच्या पाऊलखुणा :सुमारे 300 वर्षांपूर्वी, तेलनखेडी हनुमान मंदिर घनदाट जंगलात होते. हा परिसर साधु संतांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध होता. त्या ठिकाणी अनेक नागा साधू होमहवन करत असत. याशिवाय हनुमान मंदिरात सेवा करणाऱ्या महंतांच्या समाधीही येथे आहेत.

हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून भाविकांना हनुमान जयंती साजरी करता आली नव्हती. आता सर्व निर्बंध उठवण्यात आल्याने हनुमान भक्त तब्बल दोन वर्षांनंतर हनुमान जयंती साजरी करणार आहेत. दिवसभर अखंड रामायण पठण सुरू राहणार आहे. भजन, कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले आहे. सकाळी हनुमानाच्या अभिषेकानंतर आरती, हनुमान चालिसाचे पठण करण्यात येणार असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Heavy Rain : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Last Updated : May 8, 2023, 1:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details