नागपूर - पक्षाचा झेंड्याचा रंग बदलला आहे. यात राज ठाकरेचे भाषण हे सोयीच्या राजकारणानुसार बदलती भूमिका असल्याची टिका राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, त्यांची भूमिका भाजपशी जवळीक आहे का? असे विचारले असता "बडे-बडे डर जाते है" असे म्हणत राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीवर मोजक्याच शब्दात वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. (Raj Thackeray Speech Of Gudi Padva 2022) ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
दोन रंगी हे बदलले रंग लोक बघत असतात - भूमिका वारंवार पक्षाच्या बदलत असतात. राज ठाकरे यांची कालची भाषणातील बदलेली भूमिका आहे. बदलेली भूमिका ही राजकारणात काही सोयीच्या गोष्टी आणत असते. त्या सोयीने ही भूमिका बदलेली आहे. पण लोकांचा विश्वास हा मतदानानंतर ठरतो. तुमचा विश्वास कशावर आहे. भाषण करून लोकांची मत घेताना कितपत यशस्वी व्हाल, यापेक्षा आपण समाज मन बिघवड आहोत का? याचाही विचार करायला हवा असही वडेट्टीवार म्हणाले आहेत. दरम्यान, झेंड्याचा रंग पहिला पंचरंगी, मग दोन रंगी हे बदलले रंग लोक बघत असतात असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
मिले सूर हमारा तुम्हारा -राज यांचीभाजपशी जवळीक होताना दिसून येत आहे यावर प्रश्न विचारला असता "बडे बडे डर जाते है" असे म्हणत सूचक इशाराही दिला. यात मनसे ही भाजपची बी टीम आहे का, यावर बोलताना म्हणाले ही या संदर्भात एवढ्या घाईने बोलने उचित होणार नाही, पण 'मिले सूर हमारा तुम्हाला' असे काहीसे चित्र दिसत असल्याची प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे.
पाच लोकांची टीम बनवली आहे - चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी येथे काल रात्री लोखंडी तबकडी पडली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दहा बाय दहा आकाराची होती. यासंदर्भात या क्षेत्रातील तज्ञ खगोलशास्त्र अभ्यासक तसेच इतर तज्ञ मंडळींना बोलावून या सगळ्यांची चौकशी केली जाईल. त्यानंतरच कुठल्यातरी निष्कर्षावर पोहोचता येईल अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली आहे. यामध्ये पाच लोकांची टीम बनवली आहे असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या खात्यात मदत होईल -मराठवाड्याला नुकसानीची मदत देण्यास अडचण येत आहे. यावर बोलताना ते म्हणाले, बिम्स प्रणालीमध्ये अडचणी आहेत. या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची माहिती घेतल्यानंतर काही अडचणी असतील त्या दूर केल्या जात आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम झाले ते दूर होतील आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते होतील असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत.
हेही वाचा -Raj Thackeray : राज कडाडले! राजकीय नेत्यांवर घणाघात; मतदारांचेही टोचले कान