नागपूरVadettiwar On Maratha Reservation :राज्यकर्ते मराठा समाजाची निव्वळ दिशाभूल करत असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ज्यावेळी राज्याभर पाच ते दहा हजार लोकांचे मोर्चे निघाले होते, त्यावेळी केंद्र सरकार हे (Maratha Reservation Issue) आरक्षणाबद्दल निर्णय का घेऊ शकलं नाही. यांना केवळ आरक्षणाचा हा मुद्दा रेंगाळत ठेवून राजकारण करायचं होतं, (Legislature special session) असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. काल मराठा समाजाच्या लोकांवर झालेला लाठीचार्ज देखील राज्य सरकार पुरस्कृतचं होता, असा आरोपही त्यांनी केला आहे. (Jalna Maratha protestors lathicharge) नागपूर येथील रवी भवनच्या शासकीय बंगल्यात आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Vadettiwar On Maratha Reservation)
लोकांवर जाणीवपूर्वक लाठीचार्ज :सरकार केवळ या विषयावर बनवाबनवीची व फिरवा फिरवीची भाषा करत आहे. कालच्या घटनेचे संपूर्ण व्हिडिओ पाहिले आहेत. त्यात ज्या मंडपात उपोषण सुरू होतं तिथे काय काय घडलं याचा व्हिडिओ मी बघितला असून मराठा समाजाच्या लोकांवर जाणीवपूर्वक लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
पोलिसांनी गमिनी कावा नीती का वापरली नाही :उपोषणकर्त्यांमध्ये व पोलिसांमध्ये समझोता झाला नव्हता. तर पोलिसांनी गनिमी कावा ही नीती का वापरली नाही. त्या ठिकाणी ५ हजार लोकांची गर्दी होती. त्याच वेळेस पोलीस का तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर महिलांनी स्वतःच्या संरक्षणासाठी तयार केलेले कठडे तोडण्यासाठी महिला पोलिसांना आदेश कुणी दिला, असे अनेक प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत.
घोषणा देतात लाठीचार्ज का सुरू केला :मराठा समाजाच्या तरुणांनी घोषणा देणं सुरू केलं. फक्त घोषणा सुरू केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला, असं तेथील अनेक तरुण सांगत आहेत. कशाला मारता, आम्हाला मारू नका, अशी विनंती तरुण करीत असताना पण बेजबाबदारीने वागणाऱ्या पोलिसांनी गृहखात्याच्या इशाऱ्यावर मराठा समाजाला बदडून काढलं, असं वडेट्टीवार म्हणाले.