नागपूर -एकीकडे लसीचा तुटवडा असताना अनेक ठिकाणी लसीचे डोजेज वाया जात आहे. उपराजधानी नागपुरात नियोजनबद्धतेमुळे उपल्बध साठ्यात अतिरिक्त लोकांचे लसीकरण करण्यात आले. जिथे इतरत्र एका कोव्हिशिल्डच्या व्हायलमधून 10 डोज दिले जातात. तिथे नागपूरमध्ये अकरावा डोज देऊन अतिरिक्त लसीकरण करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत जवळपास 35 हजार जणांना अतिरिक्त डोज देण्यात आला. लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली, तेव्हा पूर्व कल्पना नसल्याने शेवटचा डोज वाया जात होता. पण केरळमध्ये याच व्हायलमधून 11 डोज देण्याची बाब समोर आली. त्यात लसीचा असणारा तुटवडा आणि संभाव्य लाटेचा धोका असल्याने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट मनपा प्रशासनासमोर होते. यामुळे नागपूरात सुद्धा उपक्रमाच्या माध्यमातून मोहीम राबवण्याचे ठरले.
लसीच्या प्रत्येक थेंबाला दिले महत्त्व -
राजस्थान, उत्तरप्रदेशसह काही राज्यात कोरोना लसींचे हजारो डोज वाया गेले. सरकारकडून एखादे साहित्य सामान्य जनतेसाठी आले. तर त्याचा गैरवापर होणे, ते वाया जाणे, नष्ट होणे. परिणामी गरजूला न मिळणे अगदी स्वाभाविक आहे. महापालिकेला सरकारकडून आजवर कोव्हिशील्डचे 10 लाख 25 हजार डोज मिळाले आहे. यातून महापालिकेने 10 लाख 60 हजार लोकांचे लसीकरण करून दाखविले आहे. यातून जवळपास 35 हजार अतिरिक्त लसीचे डोज देणे शक्य आहे.
तो करावा डोज कसा शिल्लक ठरतो -
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड लसीच्या एका व्हॉयलमध्ये 5.5 मिलिलिटर एवढं द्रव (लस) असते. यात वेस्ट लक्षात घेऊनच यातून 10 लोकांना लस देणे अपेक्षित असते. आयसीएमआर आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक व्यक्तीला एक डोज म्हणून 0.5 मिलिलिटर डोज द्यायचा असतो. पण व्हायलमधून इंजेक्शजनमध्ये घेताना किंवा काढताना काही थेंब वाया जातात. यामुळे 11 डोज हा 0.5 मिलिमीटरपेक्षा कमी भरतो. पण त्यामुळे कोव्हिशिल्डच्या व्हॉयलचा काटेकोरपणे वापर केला. तर प्रत्येक व्हॉयलमध्ये 0.5 मिलिलिटर शेवटचा म्हणजेच अकरावा डोज उपलब्ध होऊ शकतो. हाच अतिरिक्त डोज वापरून नागपूर महापालिकेने पाच महिन्यात तब्बल ३५ हजार लोकांचे लसीकरण केले.
लसीकरण मोहिमेसाठी प्रशिक्षण -