महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kamble Double Murder Case: बहुचर्चित उषा आणि राशी कांबळे हत्याकांड प्रकरण; आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा - Usha and Rashi Kamble

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्याचा निकाल नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात तीनही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची (मरेपर्यंत) शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांची शिक्षा दिली आहे. या प्रकरणात सरकारी वकील आणि जेष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली.

Kamble Double Murder Case
आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

By

Published : Jul 14, 2023, 6:31 PM IST

कांबळे हत्याकांड प्रकरणी वकील उज्ज्वल निकम आणि पत्रकार रविकांत कांबळे यांची प्रतिक्रिया

नागपूर:१७ फेब्रुवारी २०१८ रोजी नागपुरात घडलेल्या या घटनेत नागपूरचे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि दीड वर्षांच्या मुलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली गेली. यानंतर आरोपींनी त्यांचे मृतदेह नाल्यात फेकून दिले होते. न्यायालयाच्या निर्णयावर कांबळे कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. गणेश साहू, गुडीया साहू, अंकित साहू असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

हत्याकांडात चार आरोपी असल्याचे निष्पन्न:जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे न्यायमूर्ती एस. बी. गावंडे यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनवाई झाली. त्यात सरकारतर्फे आणि आरोपीतर्फे अंतिम युक्तिवाद झाला होता. उषा आणि राशी या आजी-नातीच्या दुहेरी हत्याकांडात चार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी एक आरोपी हा अल्पवयीन होता. न्यायालयाने तीन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.


'या' आधारे सिद्ध झाला दोष:या प्रकरणात सरकारतर्फे एकूण ३५ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. युक्तिवादाचे मुख्य मुद्दे उज्ज्वल निकम यांनी मांडले. त्यात आरोपींच्या राहत्या घरात व त्यांच्या स्वतःच्या चार चाकी एक्सयूव्ही गाडीतून उषाबाई कांबळे व राशी कांबळे यांचे रक्ताचे डाग मिळून आले. तसेच घरातून व गाडीतून मिळून आलेला रक्ताच्या डागांच्या नमुनाच्या अहवाल फॉरेन्सिक चाचणीमध्ये उषाबाई कांबळे यांच्या डीएनए सोबत जुळून आल्याचे निष्पन्न झाले आहे, असा सुद्धा युक्तिवाद करण्यात आला आहे.


आरोपींना पोते फेकताना प्रत्यक्षदर्शी पाहिले: प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांनी आरोपी गणेश शाहू, अंकित शाहू, गुडिया शाहू यांना घटनेच्या दिवशी दुकानात पाहिले होते. तसेच काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना दोन पोते आरोपीच्या घरच्या जिन्यावरून खाली उतरवून गाडीत टाकताना आणि त्यानंतर ते पोते विहिरगाव नाल्यात फेकताना साक्षीदारांनी पाहिले होते.

हेही वाचा:

  1. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींच्या धमकीचे धागेदोरे थेट लष्कर-ए-तोयबापर्यंत! मास्टमाईंडला अटक करण्याकरिता पोलीस बेळगावला रवाना
  2. Pune Crime News: अनोळखी व्यक्तीला मदत करताय...तर सावधान! आजारपणाचे ढोंग करून 18 मुलींचा विनयभंग, आरोपीला अटक
  3. Buldhana crime news : घाटात महिलेवर सामूहिक बलात्कार, वेळेवर कारवाई न झाल्याने आमदार संजय गायकवाड यांचा ठाण्यात ठिय्या

ABOUT THE AUTHOR

...view details