उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण नागपूर :प्रत्येक निवडणूक गंभीरतेनं घ्यायची असते. त्यामुळं पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल लोकसभेची सेमीफायनल असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पण, माझं मत ठाम आहे, या पाच राज्यांनी सर्वांना दाखवून दिलंय की, पुढील आगामी निवडणुका आम्ही जिंकू, पण आम्हाला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्याकडं देशाची धुरा सोपवायची आहे, असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
एक गॅरंटी काफी :भारताचा विकास कोणी करू शकत असेल, तर फक्त नरेंद्र मोदी करू शकतात, असा विश्वास देशातील सामान्य माणसाच्या मनात आहे. या देशातील सामान्य माणसाचं जीवन कोणी बदलू शकत असेल, तर नरेंद्र मोदी यांच्यात ती धमक आहे, असं फडणवीस बोलताना म्हणाले.
पुढचे नऊ दहा महिने पक्षासाठी द्या :आता आम्ही महाविजय 2024ची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या रूपानं आम्ही तळापासून संघटनेची रचना केली आहे. निवडणुकीची रणनीती आपण कशी आखली पाहिजे, आपण काय करायला हवं, याबाबत या मेळाव्यात सविस्तर माहिती दिली आहे. आपल्याला विजयाच्या भावनेनं मैदानात उतरायचं आहे. पण, 'ते' करताना अतिआत्मविश्वासाची भावना प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात असायला हवी.
तुमच्या मनात तेवढ्या जागा आपल्याला : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. आम्ही तीन पक्षांसोबत राज्यात काम करत आहोत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आहे. आम्ही तिन्ही पक्षांसोबत मिळून सरकार चालवत आहोत. लोकसभा निवडणूक असो, की विधानसभेची निवडणूक, तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. आता आम्हाला किती जागा मिळतील याची काळजी विरोधकांनी करू नये. त्यामुळं 48 व्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडून आणणं, ही आपली जबाबदारी आहे.
विरोधकांचं मनोबल खच्ची :तीन राज्यांच्या निकालानं आपलं मनोबल जसं उंचावलं आहे, तसं विरोधकांचं मनोबल खच्ची झालं आहे. ते एका डॅमेजिंग मानसिकतेमध्ये पोहोचले आहेत. हम न खेले खेल बिगाडे अशा प्रकारची मानसिकता विरोधकांची तयार झाली आहे. आपण वर्षानुवर्षे विरोधी पक्षात काम केलं. पण विरोधी पक्षात काम करत असताना आपण सत्तेचे विरोधक होतो. आपण देशाचे विरोधक नव्हतो, आपण विकासाचे विरोधक नव्हतो, आपण समाजाचे विरोधक नव्हतो, आपला वैचारिक विरोध होता, असं देखील फडणवीस यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी नवीन वर्षाचा मुहूर्त? 'या' आमदारांची नावे चर्चेत
- धारावी पुनर्विकास प्रकल्प भारतातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा; संजय राऊतांचा गंभीर आरोप
- "हे बेरोजगारी अन् महागाईमुळे झालं", संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून राहुल गांधींची टीका