मोहनलाल साहू, संचालक, हवामान विभाग नागपूर : गुरुवारपासून विदर्भात पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धोका असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेचे संचालक मोहनलाल शाहू यांनी व्यक्त केला आहे. विंड डिसटॅबन्समुळे बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लोनिक परिस्थिती तयार झाली असून त्यामुळे विदर्भातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
तापमानात 3 ते 4 डिग्रीची घट होईल : गेल्या दोन महिन्यात विदर्भात अनेक वेळा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्यावेळी विदर्भात कडक ऊन पडतं त्यावेळी वारंवार अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांची नासाडी झाली आहे. वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शुक्रवार पासून पुढील पाच ते सात दिवस विदर्भातील अनेक भागात पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच या पाच दिवसात विदर्भातील तापमानात किमान 3 ते 4 डिग्रीची घट होईल असा अंदाज नागपूर वेधशाळेचे संचालक मोहनलाल शाहू यांनी व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लोनिक :प्रादेशिक वेध शाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात अँटीसायक्लोनिक स्थिती निर्माण झाली आहे, तेथून येणाऱ्या आद्रता वाऱ्यामुळे तापमानात घट झाली असल्याने अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. उद्यापासून हवामानात बदल होईल आणि तापमानात घट नोंदवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
विंड डिसटॅबन्स म्हणजे काय : साधारणपणे उन्हाळ्यात उत्तर-पश्चिमेकडून उष्ण वारे वाहतात. बंगालच्या उपसागराकडून दक्षिण-पूर्वी वारे वाहतात. दोन वारे एकमेकांना आदळतात तेव्हा हवेत आद्रता (मॉस्चर) तयार होत असल्याने अप्पर ट्रफ वे म्हणजे (द्रोनिका) तयार होते. त्यामुळे उन्हाळ्यात पाऊस पडतो. सध्या दक्षिण-पूर्वीकडील हवेचा जोर वाढल्याने उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांचा जोर कमजोर पडला आहे. त्यामुळे विदर्भावरील आकाशात सलग पाच ते सात दिवस ढगांची गर्दी जमेल आणि अवकाळी पावसाचा धोका निर्माण होईल, अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक वेळा विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले होते. त्यानंतर आता पुन्हा विदर्भावर अवकाळीचा धोका आहे. उद्या पासून पुढील पाच ते सात दिवस विजेच्या कडकडाटसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.
25 एप्रिल नंतर उन्हाचा पारा वाढणार : ढगाळ वातावरणामुळे गेल्या 15 दिवसांपासून नागपूरसह विदर्भात कधी प्रखर ऊन तर कधी ढगाळ वातावरणात आणि पाऊस, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यात विदर्भातील काही शहरात तापमानाचा पारा 38 डिग्री पर्यत गेला होता. मात्र, अवकाळी पाऊसामुळे वातावरणात बदल झाल्याने तापमान काही अंशी कमी झाले होते. त्यामुळे प्रचंड उकाड्याने आणि गर्मीमुळे त्रस्त लोकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता 25 एप्रिल नंतर पुन्हा तापमान वाढणार असल्याचा इशारा वेध शाळेने दिला आहे.
हेही वाचा :Banned Outdoor Events : मोठी बातमी! राज्यात दुपारच्या मैदानी कार्यक्रमांवर बंदी