नागपूर - गुरुवारी दुपारी नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुई-खैरी शिवारातील वेणा नदीच्या पात्रात अनोळखी एका महिलेसह पुरुषाच्या मृतदेह हातपाय मोठ्या दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आले होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या दुहेरी हत्या प्रकरणाचा ( Unravel the double murder ) उलगडा केला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटवली. पुरुष मृतक हा वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील बिहाड गावातील रहिवासी आहे. तो सविता नामक महिलेसोबत लीव इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याने त्याच्याच दोन भावांनी ( Murder by two brothers ) मिळून त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. बुटीबोरी पोलिसांनी या प्रकरणी चार ( Four arrested ) आरोपींना अटक केली आहे.
Double Murder Case : दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; दोन भावांनीच केली हत्या, चौघांना अटक - Uttam Bodke murder case
नागपूर जिल्ह्याच्या बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुई-खैरी शिवारातील वेणा नदीच्या पात्रात आढलेल्या मृतदेहाचा उलगाडा पोलिसांनी केला आहे. लिसांनी अवघ्या 24 तासात या दुहेरी हत्या ( Unravel the double murder ) प्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

प्रेम संबंधाला घरच्यांचा तीव्र विरोध -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नदी पत्रात सापडलेला मृतदेह हा उत्तम बोडके ( Murder case ) तसेच सविता नामक महिलेचा आहे. त्यांच्यात प्रेम संबंध होते. ते दोघेही विवाहित असून वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील बिहाड गावातील रहिवासी आहेत. दोघेही विवाहित असल्याने उत्तम, सविता यांच्यातील प्रेम संबंधाला घरच्यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे दोघांनी नागपूर येथे एकत्र राहण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या या कृतीमुळे कुटुंबाची गावात, समाजात बदनामी झाल्याने संतापलेल्या उत्तमच्या दोन भावांनी संगनमत करून दोघांचीही हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दोन्ही मृतदेह दगडाला बांधून ते वेणा नदीत फेकल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
शेताचा वाद सोडवण्यासाठी बोलावले - मृतक उत्तम बोडके यांच्या भावांनी त्याला शेतीचा वाद सोडवायचा असल्याचे कारण सांगून बोलावून घेतले होते. दोघेही शेतावर गेल्यानंतर त्यांना एका गाडीत कोंबून जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीत दोघांचा ही मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी दोन्ही मृतदेहाचे हात पाय नायलॉन दोरीने बांधले. त्यानंतर ते मृतदेह 25 किलो वजनाच्या दगडाला बांधून मृतदेह वेणा नदीच्या पात्रात फेकून आरोपींनी पळ काढला होता. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी मृतक उत्तमचे दोन भाऊ त्यांना मदत करणाऱ्या आणखी दोघांना अटक केली आहे.
हेही वाचा -Fake note smuggler arrested in Muzaffarpur: मुझफ्फरपूरमध्ये बनावट नोटा तस्कराला अटक