महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवस मतसंग्रामाचा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे सहकुटुंब मतदान - nagpur assembly election 2019 day

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मतदानाची जबाबदारी येथे पार पाडली आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरींसह दोन मुलांनी आणि सुनांनी मतदानाचा हक्क बजावला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे सहकुटूंबीय मतदान

By

Published : Oct 21, 2019, 9:16 AM IST

नागपूर -संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी आज (सोमवारी) मतदान होत आहे. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मतदानाची जबाबदारी येथे पार पाडली आहे. यावेळी नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्यासह दोन मुलांनी आणि सुनांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, त्यापैकी कुणा एकाला तरी मतदान करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच नोटाचा उपयोग टाळण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.

हेही वाचा -LIVE: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू, १ हजार १६९ उमेदवार रिंगणात

यावेळी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात जे काम झाले आहे, त्याच्या जोरावर या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळेल. तसेच देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री होणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तर राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

हेही वाचा -मुंबईत मतदानाला सुरुवात

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details