महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरात कोरोनाचा धोका वाढला; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आयुक्त मुंढेंकडून घेतला शहराचा आढावा - nitin gadkari meet nagpur

केंद्र सरकारने जिल्ह्यातील कोव्हिड-१९ बाबत निरिक्षण आणि आढावा घेण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा कोव्हिड-१९ बाबत सविस्तर आढावा घेण्यासाठी आज महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

nitin gadkari meet nagpur
बैठकीचे दृश्य

By

Published : Apr 7, 2020, 3:39 PM IST

नागपूर- शहरात आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत शहरातील प्रमुख अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढीस लागल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

बैठकीचे दृश्य

केंद्र सरकारने जिल्ह्यातील कोव्हिड-१९ बाबत निरिक्षण आणि आढावा घेण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा कोव्हिड-१९ बाबत सविस्तर आढावा घेण्यासाठी आज महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कोरोनावर प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीला पालकमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती अपेक्षित होती, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचे आयोजन केल्याने राऊत उपस्थित राहू शकले नाही, अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा-आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःची काळजी घ्या, तुकाराम मुंढे यांचा प्रेमळ सल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details