महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nitin Gadkari On Karnatak Govt : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा वगळणे दुर्दैवी, नितीन गडकरींची कर्नाटक सरकारच्या निर्णयावर नाराजी - स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्र प्रथम

कर्नाटक सरकारने सत्तेत आल्यानंतर अभ्यसक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ हेडगेवार यांच्यावरील धडे पाठ्य पुस्तकातून वगळले आहेत. त्यावरु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ केशव हेडगेवार यांचे धडे पाठ्य पुस्तकातून वगळणे दुर्दैवी असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

Nitin Gadkari On Karnatak Govt
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

By

Published : Jun 18, 2023, 11:32 AM IST

नागपूर :स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राष्ट्र प्रथम या न्यायाने जन्मभर यातना सहन केल्या. मात्र आजही देशाच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या वाट्याला उपहासच येत आहे. कर्नाटक सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ हेगडेवार यांचा धडा पाठ्य पुस्तकातून वगळला आहे. त्यांचा धडा पाठ्य पुस्तकातून वगळणे अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात शनिवारी रात्री व्यक्त केली आहे.

नितीन गडकरींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन :अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने नागपुरात विं दा सावरकर यांच्यावर आधारित असलेल्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उदय निरगुडकर आणि चिराग पंडीत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरीवल पुस्तकाचा अनुवाद केला आहे. हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशीत केले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उपहास :स्वातंत्र्यवीर विं दा सावरकर यांनी आपले आयुष्य देशाच्या सेवेसाठी अर्पण केले आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण केले आहे. राष्ट्र हेच सर्वप्रथम या न्यायाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कार्य केले. मात्र त्यांच्या वाट्याला कायम उपहास आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातीभेद विरहीत हिंदू धर्माची संकल्पना मांडली. अस्पृश नसलेले हिंदुत्वासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कार्य केले. मात्र इतिहासात बऱ्यात गोष्टी येत नसल्याची खंतही यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

सिंधूपासून समुद्रापर्यंत सगळे हिंदू :स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आधुनिक हिंदू धर्माची संकल्पना मांडली होती. त्यांनी हिंदू धर्मातील अनेक चुकीच्या प्रथांवर प्रहार केले. जे चांगले आहे, ते स्वीकारले पाहिजे, या मताचे स्वातंत्र्यवीर सावरकर होते, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. हिंदुत्व हे इतर धर्मांच्या विरोधात आहे, असा विचार पसरवला गेला आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू धर्म हा सर्वसमावेश असून तो कोणत्याही धर्माच्या विरोधात नसल्याचे मुद्दा मांडला. सिंधूपासून समुद्रापर्यंत सगळे हिंदू असल्याचेही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्पष्ट केले होते, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

अल्पसंख्यांकाचे आम्हीच खरे रक्षक :गेल्या 9 वर्षात भाजपने अनेक योजना आणल्या, त्यातील एकाही योजनेला जातीपातीच्या राजकारणातून लागू केले नाहीत. मात्र हिंदुत्व हे इतर धर्माच्या विरोधात कधीच नव्हते आणि नाही. मात्र इतर राजकारण्यांनी हिंदुत्व हे इतर धर्माच्या विरोधात असल्याचे ठसवून केवळ वोटबँकेचे राजकारण केले. भाजपने कोणत्याही योजनेत जात, पंथ, धर्म मांडला नाही, मात्र चांगले वागत असताना वोट बँकेसाठी काही पक्ष राजकारण करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी काही पक्ष राजकारण करत आहेत. मात्र आम्हीच अल्पसंख्यांकाचे खरे रक्षक असल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी ठणकावले.

हेही वाचा -

  1. Nitin Gadkari in Bhandara: काँग्रेसने मागील 60 वर्षात केलेल्या कामाच्या दुप्पट कामे आम्ही 9 वर्षात केली- नितीन गडकरी

ABOUT THE AUTHOR

...view details