नागपूर - राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाही. अशात संकट मोचक म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची नावे चर्चेत आली आहेत. या पार्श्वभूमीवर आज या दोघांची नागपुरात भेट होणार आहे.
'जिव्हाळा' पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने गडकरी आणि भागवत दोघेही एका ठिकाणी येणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्यात सत्ता संघर्षाचा तिढा सोडवण्याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.