महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amit Shah Dikshabhumi Visit: दीक्षाभूमी ही जगातील दलित, शोषित आणि मागासवर्गीयांसाठी प्रेरणास्थान - गृहमंत्री अमित शाह

नागपूरच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दीक्षाभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दीक्षाभूमी स्मारक समिती सदस्यांकडून त्यांचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी येथे अभिप्राय नोंदवहीत भावनांची नोंद केली. दीक्षाभूमी ही जगातील दलित, शोषित आणि मागासवर्गीयांसाठी प्रेरणास्थान असल्याची भावना शहा यांनी व्यक्त केली.

Amit Shah Dikshabhumi Visit
अमित शाह

By

Published : Feb 18, 2023, 9:30 PM IST

नागपूर:आज दुसऱ्यांदा महान दीक्षाभूमी स्मारकाला भेट देण्याचे भाग्य लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ केवळ भारतीयच नाही तर जगातील दलित, शोषित आणि मागासवर्गीयांसाठी प्रेरणास्थान आहे. लोकशाहीचे मूल्य आणि सिद्धांत बाबासाहेबांनी आपल्या संविधानात समाविष्ट करून भारताच्या संविधानाला अतुलनीय बनवले आहे. मी थोर महापुरुषांला अभिवादन करतो, असे गृहमंत्री अमित शाह यांनी नोंदवहीत लिहिले आहे. भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्यासोबत होते.


सुरक्षेच्या बाबतीत 70 टक्के आत्मनिर्भर:अमित शाह म्हणाले, येणारी 25 वर्षे देशातील सर्व लोक एक ध्येय समोर ठेवून वाटचाल करणार आहे. गेल्या 9 वर्षांत (मोदी काळात) आपण बरेच काही प्राप्त केले आहे. आपल्याला हत्यार, शस्त्र नाही मिळाले तर भारत आपली सुरक्षा नाही करू शकणार असे बोलले जायचे. मात्र, गेल्या 9 वर्षांत भारत सुरक्षेच्या बाबतीत 70 टक्के आत्मनिर्भर झाला आहे. कोरोना काळात मोदींच्या सांगण्यावरून देशाने संयम पाळले. जनता कर्फ्यु हा 130 कोटी जनतेने पाळले. लालबहादूर शास्त्री यांनी जनतेला आवाहन केल्यावर लोकांनी शनिवारी जेवणे सोडले होते. त्यानंतर मोदींच्या सांगण्यावरून जनतेने संयम पाळून दाखविले.


80 कोटी लोकांना धान्य दिले:लोकं म्हणतात की, मोदी यांनी कोरोनात देशात लॉक डाऊन केला. हो केले. जोवर लस नाही बनली तोवर लोकांचे जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन केला. लस बनल्यानंतर ते खुले केले. दोन वर्षे 80 कोटी लोकांना मोदी यांनी धान्य दिले असे कुठेच झाले नव्हते. मोदी सरकारने अनेक कटू निर्णय घेतले. मोदी सरकारने लोकांना चांगले वाटावे असे निर्णय नाही केले. तर लोकांचे चांगले व्हावे असे निर्णय घेतले. लोकशाहीत लोकांना आवडणारे निर्णय घेणे सोपे असते. मात्र लोकांचा चांगला होईल असे निर्णय घेणे महत्त्वाचे आहे आणि त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात आम्ही एका नंतर एक निवडणूक जिंकत आहोत, असे अमित शाह बोलले.


हिंसाचारात 80 टक्के घट:आम्ही कधीही वोट बँकेचे राजकारण करत नाही. मोदी सत्तेत येण्यापूर्वी देशातील तीन भाग आंतरिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आव्हानात्मक होते. काश्मीर, ईशान्य भारत आणि दंडकारण्य हे तीन क्षेत्र होते. आज या तिन्ही क्षेत्रात हिंसेत 80 टक्के कमतरता झाली आहे. डाव्यांच्या (नक्षलवादी ) हिंसे संदर्भात देशातील 160 जिल्हे संवेदनशील होते. त्यात कमी झाली आहे. डाव्यांच्या दहशतवादापासून अनेक राज्य मुक्त होत आहेत. नक्षलवाद आता छोट्याशा भागापुरता मर्यादित राहिला आहे. तिथे सुरक्षा दल लढा देत आहे, तिथे भारताचा विजय होईल, असा विश्वास देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.

हेही वाचा:Governor Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन, आज घेणार राज्यपालपदाची शपथ

ABOUT THE AUTHOR

...view details