महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 9, 2022, 5:09 PM IST

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : अवघ्या 25 दिवसात मेट्रो आणि नाग नदी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी - देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार ( PM Modi Inauguration Samruddhi Highway ) आहे. त्याशिवाय मेट्रो टप्पा-२ प्रकल्पाला आणि नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

नागपूर :विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार ( PM Modi Inauguration Samruddhi Highway ) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरला आणखी दोन भेट दिल्या आहेत. ते म्हणजे मेट्रोच्या दुसऱ्या टप्पा आणि नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाला केन्द्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी दिलेली आहे. हे दोन्ही प्रकल्प नागपूरसाठी ऐतिहासिक सिद्ध होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ते नागपूर विमानतळावर बोलत होते.

देवेंद्र फडणवीस

दोन्ही प्रकल्पांना मंजुरी : 2019 साली नाग नदी आणि मेट्रो दुसरा टप्पा हे प्रकल्प सादर करण्यात आले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अगदी छोट्या छोट्या कारणांनी ते रोखून धरले होते. त्यामुळे अडीच वर्षे हे प्रकल्प रखडलेले होते. मात्र, आणि अवघ्या 25 दिवसांमध्ये सर्व प्रश्न मार्गी लावल्यामुळे आज या दोन्ही प्रकल्पांना केन्द्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.



1 हजार 927 कोटींचा प्रकल्प : नाग नदी प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी सिवरलाईन नेटवर्कचे नूतनीकरण करण्यात ( Nag River Rejuvenation Project ) येईल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1 हजार 927 कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि नागपूर महानगरपालिका यांची भागीदारी असेल. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा हा 60 टक्के असेल तर राज्य सरकार 25 टक्के भार उचलणार आहे, नागपूर महानगरपालिकेला 15 टक्के खर्च करावा लागणार आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडून 1 हजार 115.22 कोटी, राज्य शासनाकडून 507.36 कोटी तसेच मनपाकडून १५ टक्के म्हणजे 304.41 कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 131861 घरांना सीवर नेटवर्क मध्ये जोडण्यात येईल.



मेट्रो टप्पा-२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यापूर्वी केंद्र सरकारकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले नागपूर मेट्रो टप्पा-२ प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली (Metro Phase two Project Approval ) आहे. केंद्र सरकारने नागपूरच्या विकासाला चालना देणारे मेट्रो टप्पा-२ व नागनदी पुनरुज्जीवन या एकूण ८ हजार ८०८ कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना केंद्र सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. मेट्रो टप्पा - दोन ४३. ८ किलोमीटरचा असून ६,७०८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या टप्प्यात नागपूरलगत बुटीबोरी, कन्हान आणि हिंगण्यापर्यंत मेट्रो धावणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details