महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार - मंत्री शंभूराज देसाई

नुपूर शर्मा प्रकरणावरून कथित हत्या झाल्याने चर्चेत आलेल्या अमरावती मधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची ( Umesh Kolhe murder case ) गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्याचे निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ( Minister Shambhuraj Desai ) यांनी आज सभागृहात दिले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( former Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या यांनी केलेल्या एका फोनची चौकशी ( Uddhav Thackeray phone will be investigated ) केली जाईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

Umesh Kolhe murder case
शंभूराज देसाई

By

Published : Dec 23, 2022, 6:17 PM IST

नागपूर : राज्यात गाजलेल्या नुपूर शर्मा प्रकरणावरून अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe murder case ) करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला होता. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी उमेश कोल्हे हत्येप्रकरणी ( Umesh Kolhe murder case ) लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई ( Minister Shambhuraj Desai ) यांनी उमेश कोल्हे हत्येप्रकरणाची गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्याचे निर्देश आज सभागृहात दिले.

माजी मुख्यमंत्र्यांवर राणांचा आरोप :उमेश कोल्हे हत्येप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून हा तपास चोरीच्या दिशेने करण्यास पोलिसांना आदेश दिले होते. तत्कालिन पोलीस आयुक्त आरती सिंह यांना दुरध्वनीवरून तसे आदेश देण्यात आले होते, असा आरोप अमरावती जिल्ह्यातील बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी हिवाळी अधिवेशनात केले आहे.

उद्धव ठाकरेंचे फोनची चौकशीची मागणी : आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) म्हणाले की, याप्रकरणीची माहिती खासदार नवनीत राणा व मी स्वतः गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आम्ही त्यांना दिली. त्यांनी या संदर्भात एनआयएकडे तपास सोपवला होता. दिल्लीवरून एएनआयचे पथक आल्यावर तेव्हा नुपूर शर्माच्या समर्थनार्थ हिंदुत्वाच्या बाजूने पोस्ट केल्याने कोल्हे यांची भर चौकात हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या फोनची चौकशी ( Uddhav Thackeray phone will be investigated ) व्हावी, अशी मागणी राणा यांनी विधानसभेत केली.



मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा : यासंदर्भात सभागृहात उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी सांगितले की, उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आजवर जे काही घडले त्याचा विस्तृत अहवाल राज्याच्या गुप्तचर विभागाकडून घेण्यात येईल. तसेच तो अहवाल पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. जर रवी राणा यांनी आरोप केल्याप्रमाणे खरंच या प्रकरणात तपास चुकीच्या दिशेने नेण्यासाठी दबाव आणण्यात आला होता का, पोलिसांना कुणी कुणी फोन केले याचा राज्याच्या गुप्तचर विभागाकडून अहवाल घेण्यात येईल आणि तो गृहमंत्री फडणवीस यांना सादर केला जाईल, अशी घोषणा देसाई यांनी सभागृहात केली.

ABOUT THE AUTHOR

...view details