महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : अॅड. उज्ज्वल निकम पीडितेच्या बाजूने न्यायालयात लढणार - गृहमंत्री

पीडित मुलीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पीडितेच्या बाजूने अॅड. उज्ज्वल निकम खटला लढतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख
गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Feb 4, 2020, 10:28 PM IST

Updated : Feb 4, 2020, 10:34 PM IST

नागपूर - हिंगणघाट येथे झालेली घटना अतिशय निंदनीय आहे. पीडित मुलीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पीडितेच्या बाजूने अॅड. उज्ज्वल निकम खटला लढतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. नागपूर येथील पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते.

हिंगणघाट जळीतकांड : अॅड. उज्ज्वल निकम पीडितेच्या बाजूने न्यायालयात लढणार

हेही वाचा - तपास महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याकडे देणार - पोलीस अधीक्षक
जनभावना आणि गुन्ह्याची तीव्रता पाहता आरोपीला कठोर शिक्षा करण्यासंदर्भात सूचना देणार आहे. या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. आंध्र प्रदेशामधल्या घटनेचा अभ्यास करून त्यांनी हे प्रकरण हाताळावे, असेही देशमुख म्हणाले.
पीडितेवर उपचार करण्यासाठी मुंबईवरुन डॉ. सुनिल केसवानी यांच्या नेतृत्त्वाखाली डॉक्टरांची एक टीम नागपूरला पाठवण्यात आली आहे.

Last Updated : Feb 4, 2020, 10:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details