नागपूरUddhav Thackeray On Nirgude Resignation : आठ दिवसांपूर्वी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी पदाचा राजीनामा (Anand Nirgude Resignation) दिला. मात्र, ही बाब सरकारने लपवून ठेवली. त्यांच्यावर कोणत्या दोन आमदारांचा दबाव होता. त्यांच्या राजीनाम्यात काय दडलंय, हे पुढे यायला हवं. त्यांच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.
भुजवळ पेढे आणि पटेलांकडे जेवायला जाणार :राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सदनमधील भ्रष्टाचारप्रकरणी ईडीने दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आता भुजबळांकडे पेढा खायला तर प्रफुल पटेलांकडे कमी मिरची असलेले जेवण करायला जाणार आहे. ज्याप्रमाणे भुजबळांना जडीबुटी मिळाली त्याचप्रमाणे इतरांनाही मिळो.
नागपूरला पाण्यात बुडविणाऱ्यांची चौकशी करा: मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश उद्योगमंत्री तसेच नगरविकासचे प्रभारी उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले आहेत. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व महापालिकेच्या चौकशी करा, असं आव्हान दिलं. तसेच गणेशोत्सवादरम्यान नागपूरला पाण्यात बुडवणाऱ्या विकासपुरुषांची चौकशी करावी, सोबतच पीएम केअर फंडाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केलीय.