महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vajramuth Sabha : उलट्या पायाच्या सरकारमुळे राज्यात अवकाळी; उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर जोरदार टीका

भाजपच्या बालेकिल्यात झालेल्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीचे सरकार भाजपने पाठीत खंजीर खुपसून पाडल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर सरकार धर्माच्या नावाखाली बगल देत असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच राज्यात उलट्या पायाचे सरकार आल्यामुळेच सारखे अवकाळीचे संकट येत असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.

Vajramut Sabha
Vajramut Sabha

By

Published : Apr 16, 2023, 9:01 PM IST

Updated : Apr 16, 2023, 10:14 PM IST

उद्धव ठाकरे यांचे भाषण

नागपूर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा रविवारी नागपुरात झाली. या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह देंवेद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यात उलट्या पायच्या सरकारमुळे राज्यात अवकाळी होत असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यापेक्षा सरकार दौऱ्यात व्यस्त असल्याची टीका देखील ठाकरे यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. मात्र, आताच्या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणेघेणे नसल्याचे ठाकरे म्हणाले.

सत्तेच्या नशेमुळे देश उध्वस्त : पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले की, सत्तेच्या नशेमुळे राज्यासह देश उद्धवस्त होत आहे. आपल्या देशात खरच लोकशाही आहे का? असा प्रश्न निर्माण झाल्याचे ठाकरे म्हणाले. लोकशाहीचा उपयोग केवळ सत्तेवर बसलेल्यांसाठीच होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिंत्राचा क्रम जगात वाढत चालला आहे. मात्र, देशातील नागरिकांचा क्रम खाली जात आहे, अशी टीका त्यांनी नाव न घेता अदानी समुहावर केली आहे. मीच घटनेचे रक्षण करणार असा निर्धार सर्वांनी करायला हवा, असे आवाहन त्यांनी सभेत आलेल्या नागरिकांना केले आहे.

शिवसेनेची फसवणुक :भाजपने आम्हाला फसवल म्हणुन महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. जर आमचे सरकार नालायक असते तर, तुम्ही सभेले आले असते का असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. आमचे सराकार भाजपने पाठीत वार करुन पाडले. मात्र, अम्ही पाठीत वार करणारे नाही. आम्ही छातीवर झेलणारे आहोत अशी शिकवण आम्हाला शिवाजी महाराजांनी दिली आहे. एकानाथ शिंदे राम भक्त असते तर, असामला गेले नसते. ते आधी आयोध्येला गेले असते असा समाचार त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याचा घेतला. फडणवीस कधी आयोध्याला गेले नाहीत, आत्ताच कसे गेले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्यातले उद्योग गुजरातने पळवले : अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या मालाची माती झाली. राज्यात शेतकरी आक्रोश करीत आहेत, अधिकारी पंचनामा करायला तयार नाहीत. आमच्या सराकारने थेट शेतकऱ्यांना मदत केली होती. मी घरात बसुन कारभार केला तो काळ तसा होता, काम कराचे असेल तर कोठे बसुनही करता येते. तुम्हाला काम करता येत नसेल तर तुमच्या पदाचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदेंना विचारला. राज्यात आलेले उद्योग दिल्लीवरुन गुजरातला पळवले. नागपूरमध्ये येणारे रोजगार पंतप्रधांनानी गुजरातला पळवल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी आठ वर्षात काय केले याचा हिशोब द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेना प्रमुखांचा अपामान : माझे वडील चोरणारे तुम्ही जनतेचे काम काय करणार प्रहार त्यांनी शिंदेवर केला आहे. बाबरी प्रकरणावर बोलतांना ठाकरे म्हणाले की, बाबरी पाडायला शिवसैनिक गेले नव्हते तर, चंद्रकांत पाटलांचे काका गेले होते का अशी टीका त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. चंद्रकांत पाटील जे बोलले ते मोहन भागत यांना मान्य आहे? शिवसेना प्रमुखाचा अपामान तुम्हाला मान्य आहे का? मी हिंदुत्व सोडले अशी टीका माझ्यावर करता. मला संघाला सांगायचे आमचे हिंदुत्व शेडी जाणव्याचे नाही. तुमचे हिंदुत्व गोमुत्रधारी असुन कोणत्या दिशेला तुम्ही देश घेऊन जाता आहात. संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या सभेनंतर यांनी गोमुत्र शिंपडले. तीथे आलेला माणस विविध जाती धर्माचे नागरिक होते हे संघाला मान्य आहे का? मोहन भागवत मशिदीत गेले, उत्तर प्रदेशात मदरशात गेले हे तुम्हाला चालत. मात्र आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणुन आमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका करता. असल्या हिंदुत्वच्या भाकड कथा आम्हाला सांगु नाका असे देखील ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - NCP Never Join BJP : राष्ट्रवादी भाजपशी कधीही हातमिळवणी करणार नाही; शरद पवारांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन, राऊतांचा दावा

Last Updated : Apr 16, 2023, 10:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details