नागपूर -नरखेड तालुक्यातील अंबाडा येथे शेतात जंगली श्वापदाच्या त्रासापासून बचावासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाचा शॉक लागून, दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नानाजी बेले यांनी आपल्या शेतात उन्हाळी भुईमूग पेरला आहे. या भुईमुगाला जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी आपल्या शेताच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडला होता. मात्र ते विद्युत प्रवाह बंद करायला विसरले, आणि सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या दोन महिलांचा शॉक लागून मृत्यू झाला. कलाबाई ज्ञानेश्वर कुमरे (४८) आणि सुशीला सुरेशराव दहिवाडे (४९) दोघी राहणार खलानगोंदी असे या मृत महिलांचे नाव आहे.
नानाजी बेले यांची शेती ही खलानगोंदी शिवारात आहे. त्यांनी १२ एकर शेतात उन्हाळी भुईमूगाची लागवड केली आहे. मात्र जंगली प्राणी पिकांची नासाडी करत असल्याने त्यांनी पिकाच्या संरक्षणासाठी कुंपनामध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. या विदयुत प्रवाहामुळे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या महिला नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या, मात्र विद्युत प्रवाह बंद करायला बेले विसरल्याने शॉक लागून या महिलांचा मृत्यू झाला.