नागपूर -रविवारी रात्री भीमनगर येथील मायलेकी पुरात वाहून ( swept away in flood ) गेल्या होत्या. आईचा मृतदेह सोमवारी दुपारी काही अंतरावर मिळाला होता तर, मुलीचा शोध सुरू होता. शेवटी सुमारे ३६ तास लोटल्यानंतर आज घराशेजारीचं असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यावर अंजलीचा मृतदेह आढळून आला आहे. एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
पुराचे पाणी भीमनगरात शिरले -रविवारी हिंगणा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy rain in Hingana tahsil ) ईसासनीतील भीमनगर मधील नाला ओसंडुन पुराचे पाणी ( Bhimnagar flood ) भीमनगरात शिरले होते. पुराच्या लोंढ्यात मायलेकी वाहून गेल्या होत्या. आईचा मृतदेह सकाळी आढळून आला होता. मात्र, मुलीच्या मृतदेहाचा शोध लागत नव्हता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीचा शोध पुन्हा सुरू केला असता कोल्हापुरी बंधाऱ्यात मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.