महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यात हाणामारी, 93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा समावेश

नागपूर मध्यवर्ती काराकृहात 93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी या दोघांत हाणामारी झाली. ही हाणामारी सोडविण्यास गेलेल्या तुरुंग सुरक्षा रक्षाकावरही त्यांनी हल्ला केला. यात सुरक्षारक्षक जखमी झाला आहे.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात
नागपूर मध्यवर्ती कारागृहात

By

Published : Feb 26, 2020, 12:00 PM IST

नागपूर- मध्यवर्ती कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाली असून त्यांना सोडवण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकावरही हल्ला करण्यात आला. यात सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा मध्यवर्ती कारागृह चर्चेत आले आहे. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नावेद हुसेन खान रशीद हुसेन खान आणि मोहम्मद आजम असलम भट, अशी आरोपी कैद्यांची नावे आहेत. नावेद हुसेन हा १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असून त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावल्यापासून तो मध्यवर्ती कारागृहात आहे. तर मोहम्मद आजम याला खुनाच्या गुन्ह्य़ात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दोन्ही कैद्यांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू असताना दोघांनीही एकमेकांवर हल्ला केला. तेव्हा त्यांचे भांडण सोडवायला गेलेल्या सुरक्षा रक्षकालाही त्यांनी मारहाण केली आहे.

हेही वाचा -नागपुरात कुख्यात गुंड संतोष आंबेकरचा बंगला होणार जमीनदोस्त.. पाडकामास सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details