नागपूर - ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेकडून लाच मागितल्याप्रकरणी नागपूर पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आले. 25 हजार रुपये आणि शरीर सुखासाठी 3 मुलींची मागणी या कर्मचाऱ्यांनी या महिलेकडे केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. दामोदर राजूरकर आणि शितलाप्रसाद मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून ते पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत आहेत.
नागपूर: लाच प्रकरणी नागपूर गुन्हे शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक; २५ हजार आणि शरीर सुखासाठी तीन मुलींची केलेली मागणी हे ही वाचा -नागपुरात जुन्या वादातून तरुणाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद
तक्रारीदार महिलेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय असून काही दिवसांपूर्वी मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याच्या प्रकरणात ती आरोपी होती. महिलेला या प्रकरणातील कारवाई पासून वाचवण्यासाठी गुन्हे शाखेच्या या दोन कर्मचाऱ्यांनी तिच्याकडून 25 हजार रुपये आणि 3 मुलींची मागणी केली होती. मंगळवारी रात्री उशिरा एसीबीने महिलेच्या तक्रारीवरून दामोदर राजूरकर आणि शितलाप्रसाद मिश्रा या दोघांना ही अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या भंडारा पथकाकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता.
हे ही वाचा -पुणे, कॉसमॉस बँक 'सायबर' लूट प्रकरणातील आरोपींना अटक, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई