महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

८० लाखांचा कर माफ करण्यासाठी तीन लाखांची लाच; दोघेजण एसीबीच्या जाळ्यात - Acb action against employee of nmc

तक्रारदार रामचंद्र जेठानी नामक व्यक्ती असून त्यांच्या मालकीचे रिसॉर्ट आणि लॉन आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी संगनमत करून जेठानी यांना ८० लाखांचा कर थकीत असल्याचं कारण देत नोटीस बजावली होती.

कर माफ करण्यासाठी तीन लाखांची लाच;  दोघेजण एसीबीच्या जाळ्यात
कर माफ करण्यासाठी तीन लाखांची लाच; दोघेजण एसीबीच्या जाळ्यात

By

Published : May 8, 2021, 12:09 PM IST

नागपूर - ८० लाखांचा कर माफ करण्यासाठी तीन लाखांची लाच मागणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सुरज गणवीर आणि रवींद्र बागडे असे लाचखोरांचे नाव असून ते नागपूर महानगरपालिकेच्या आशी नगर झोन येथे कार्यरत आहेत. सुरज गणवीर हा कर संग्रहक आहे, तर रवींद्र बागडे सायबर टेक कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार रामचंद्र जेठानी नामक व्यक्ती असून त्यांच्या मालकीचे रिसॉर्ट आणि लॉन आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी संगनमत करून जेठानी यांना ८० लाखांचा कर थकीत असल्याचं कारण देत नोटीस बजावली होती. कर माफ करायचा असेल तर ६ लाखांची लाच द्यावी लागेल, असा प्रस्ताव देखील आरोपींनी जेठानी यांना पाठवला होता.

कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून लॉनचा व्यवसाय ठप्प पडला असल्याने सहा लाख देणे शक्य नसल्याचे जेठानी यांनी सांगितले. तेव्हा तीन लाखात सौदा पक्का झाला. जेठानी यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सापळा रचून दोन्ही आरोपींना रंगेहात अटक केली.

एसीबीने घेतली दोन्ही लाचखोरांच्या घराची झडती-

नागपूर महानगरपालिकेच्या आशी नगर झोन मध्ये कार्यरत कर संग्रहक सुरज गणवीर आणि सायबर टेक कंपनीच सुपरवायझर रवींद्र बागडे या दोघांना तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. यानंतर दोघांच्या घराची एसीबीकडून झडती घेण्यात आली, त्यामध्ये बेहिशोबी काही सापडले किवा नाही या संदर्भात अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details