नागपूर- कोरोनाचा विळखा राज्यात वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याची धास्ती घेतली आहे. आता नागपुरात कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील कोरोनाची संख्या एकूण तीन झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
कोरोना व्हायरस: नागपुरातील 'त्या' व्यक्तीच्या दोन नातेवाईकांनाही लागण - कोरोना व्हायरस नागपूर
नागपुरात 11 मार्चला 45 वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला होता. तो व्यक्ती काही दिवसांपुर्वी अमेरिकेहून परत आला होता. लक्षणे आढळल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात केले होते. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 15 नातेवाईकांची चाचणी करण्यात आली. त्यातील दोघांना कोरोना झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा-कोरोना : मास्क अन् सॅनिटायझरचा काळाबाजार; पुण्यातील चार मेडिकल दुकाने सील
नागपुरात 11 मार्चला 45 वर्षीय व्यक्तीचा अहवाल सकारात्मक आला होता. तो व्यक्ती काही दिवसांपुर्वी अमेरिकेहून परत आला होता. लक्षणे आढळल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात केले होते. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 15 नातेवाईकांची चाचणी करण्यात आली. त्यातील दोघांना कोरोना झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. 45 वर्षीय व्यक्तीवर मेयो तर त्याच्या नातेवाईकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.