महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 23, 2019, 5:53 PM IST

ETV Bharat / state

नागपुरात वेगवेगळ्या घटनेत एमडी ड्रग्ससह दोघांना अटक

नागपूर शहरात अमली पदार्थ तस्करीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

तस्करांसह पोलीस पथक

नागपूर - अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका युवकाला पकडण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे. अनमोल खोब्रागडे, असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

घटनेबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी

शहरात अमली पदार्थ तस्करीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या आठवड्यात नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेकडून २० ग्रॅम हिरोईन पावडर जप्त केली होती. त्यानंतर आज पुन्हा एका तरुणाला २७ ग्रॅम एमडी पावडरसह (मेफेड्रोन) अटक करण्यात आली आहे

अनमोल खोब्रागडे नावाचा तरुण मुंबईवरून एमडी पावडर (मेफेड्रोन) ड्रग्स घेऊन नागपूरला येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे या पथकाने भोळे पेट्रोल पंप परिसरात सापळा रचला. तसेच ज्या बसमधून अनमोल येणार होता त्या बसला घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळून २७ ग्रॅम एमडी पावडर (मेफेड्रोन) ड्रग्स आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत ८५ हजार आहे.

या शिवाय सीताबर्डी पोलिसांनी सुद्धा एका ड्रग्स तस्कराला अटक केली आहे. मृणाल गजभिये हा तरुण एमडी ड्रग्सची खेप घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती सीताबर्डी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून गजभिये याला अटक केली. त्याच्याकडून ३५ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले असून जप्त ड्रग्सची किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details